वाचल काय आणि नाही वाचल काय!

Posted: सप्टेंबर 29, 2011 in प्रवर्ग नसलेले

अगदी शब्दश: मी कोण आहे ह्या पेक्षा मी काय आहे हे मला अधिक महत्वाचं वाटत. लेखक? कवी? चित्रकार? की आणखी काही? पण त्या अगोदर…

मी तान्हा असताना… घाबरलात ? तुम्हाला काय वाटलं मी आतां अगदी कित्येक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे अशा थाटात सुरु करणार ? नाही. पण असं ऐकल की तान्हा असताना मी नर्सच्या हातातल पेन हिसकावून घेतल म्हणे. आणि तोंडात घातल. आणखी काय करणार म्हणा ! पेन पेपरवर टेकवून लिहील त्या नंतर खूप वर्षानी. कविता लिहिल्या. ज्या आईने तत्परतेने बाल्कनीतून फेकून दिल्या. आणि मी जाऊन परत आणल्या. पण पुन्हा मात्र कित्येक वर्ष काहीच लिहील नाही. न जाणो, माझे अलौकिक विचार पुन्हा असेच पायदळी तुडवले गेले तर ? ह्या भीतीने. मी शिकलो जाहिरात कला. त्या मुळे चित्र किंवा व्हिज्यूअल्सशी माझा अधिक जवळचा सम्बंध. काही वर्षानी रोज तेच-तेच काम करून कंटाळलो. त्यात भर पडली कॉम्प्यूटर शिकण्याच्या सक्तीची. मी अक्षरश: घाबरलो. आपल्याला काही तो कॉम्प्यूटर जमणार नाही हा ठाम समज मनात होता. एक दिवस सहजच थोडस लिहून पाहिल. जमल्यासारख वाटल. यथावकाश मी लिहिता झालो. असं अचानक कुणी लिहित कसं होऊ शकत ? त्या बद्दल लवकरच तुम्हाला सांगेन…

प्रतिक्रिया
  1. Mr WordPress म्हणतो आहे:

    Hi, this is a comment.
    To delete a comment, just log in, and view the posts’ comments, there you will have the option to edit or delete them.

  2. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

    ओळख छान करून दिलीत … येऊ द्या पुढच लिखाण लवकरच….

यावर आपले मत नोंदवा