झुरळ…

प्रयोग शाळेत चिरफाड करायला

झुरळ उपलब्ध नाहीत म्हणून

त्यांना पकडण्याची मोहीम

अक्षरश: हाती घेणार्यांची

नजर लागत्ये कपाटात, फडताळात

आपल्याला न मारता फक्त पकडून

डब्यात, बाटलीत का भरतायत

असा प्रश्न झुरळानाही पडलाय

त्यांना काय माहित की

त्यांचा बाजार भरतो

आणि लावली जाते बोली

त्यांच्या वजनाप्रमाणे

रुपये पाच ते आठ पर्यंत कितीही

आणि मेडिकलचे विद्यार्थी

विकत घेतात त्यांना

पालीना घाबरणारे

उठलेत त्यांच्या जीवावर

शेपटावर घालतायत घाव

अगदी जीव जाईस्तोवर

साजूक खाणार्यांच्या घरात

कवच लागलीत दिसायला

कसही करून झुरळ वाचलीत पाहिजेत

या करीता मोर्चे निघतायत

परिसंवाद झडतायत गल्ली बोळात

झुरळासाठी खास दीर्घायुषी पिल्स

आल्यायत बाजारात

आणि झुरळाना पकडताना

घाम गाळावा लागल्यामुळे

जाड बायका होतायत बारीक

ह्यात पेस्ट कंट्रोलवाल्यांची मात्र

फारच झाल्ये पंचाईत

स्प्रेच्या डब्यांवर त्यांना

ठळक अक्षरात छापाव लागतय

” झुरळाना अपायकारक नाही ”

महाराष्ट्र शासनाने तर

झुरळांची पैदास हा

लघु उद्योग म्हणून जाहीर केलाय

आणि बकाही देतायत कर्ज

प्रोत्साहन म्हणून

इथून पुढे तर

” मुलगा काय करतो तुमचा ”

ह्या वधू पक्षाच्या प्रश्नावर

आई – वडील अभिमानाने

उत्तर देतील…

” त्याचा झुरळाचा फार्म आहे ”
—————————————

दुसरीकडे…

झुरळांचे लाड पाहून

एका बेडकाला हुशारी आली, वाटल

आपल्यावर असच प्रेम करायची

माणसांवर आता वेळ आली

बघून दरवाजा उघडा

घुसला घरात नागडा

भर उन्हाळ्यात बेडूक बघून

मंडळी फारच घाबरली

त्याला हुसकवायचा

मार्ग शोधू लागली

तेव्हढ्यात बेडकाच्या आईने

त्याची तंगडी पकडली आणि

गल्ली – बोळात धाऊ लागली

कळेना त्याला झालय काय

आई का माझे ओढ्त्ये पाय ?

” गाढवा ! तू बुद्धीने किती मंद

आपली चिरफाड कधीच झाल्ये बंद

बेडूक उडया मारायचं

आता तरी दे सोडून

एकाच डबक्यात राहा

पाण्याची खोली पाहून “

Advertisements
प्रतिक्रिया
  1. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

    भारीच कल्पना आणि छान उतरवलय शब्दात … 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s