कथा – (भाग १)

सकाळचे सहा  वाजत आले होते. बेड लंप  बंद करून अनिरुद्धने डोळे मिटून घेतले पण क्षणभरच. रात्रभर जागून त्याने नव्या कथेवर शेवटची नजर फिरवली होती, तिच्यात काही बदल केले, चुका सुधारल्या होत्या आणि मनासारखं संपादित केलं होत. अनिरुद्धने कधीही एकाच विषयावर कथा लिहिल्या नाहीत. किंबहुना कोणताच विषय त्याला वर्ज्य नव्हता. अर्थात एखादा विषय ठरवून त्याने कोणतीच कथा लिहिली नाही. त्याला जसं सुचत गेलं, तसं तो लिहित गेला. गुन्हेगारी कथा लिहिण्याची ही त्याची पहिलीच वेळ, त्यामुळे त्याने बराच रिसर्च केला होता, माहिती मिळवली होती. कथा मनासारखी झालेली आहे ह्याची त्याला खात्री पटली आणि आज तिला पोस्ट करायच असा विचार करून तो थोडा पहुडला.
————————————————————————————————
दिवाळी अंकासाठी मागविलेल्या साहित्याचे विषयानुरूप संकलन करण्यात संपादक महाशय दंग झाले होते. बरचस कथा बाह्य साहित्य नजरे खालून घातल्यावर ‘ कथा ‘ हे शीर्षक असलेली कथा त्यांनी वाचायला घेतली.                                                                                       ————————————————————————————————

 

 

 

 

मुंबई. द सिटी दट नेव्हर स्लीप्स. कधीही न झोपणार शहर. खरच, ज्याने कुणी हे वाक्य लिहील, त्याने कित्येक रात्री जागून ह्या शहराच खर स्वरूप पाहिलं असणार. रात्र. ती ही मुंबईतली. काळ बदलला पण इथली रात्र बदलली नाही. क्लब्स पासून रेव्ह पार्टी पर्यंत आणि मुजरया पासून डान्स बार पर्यंत रात्र घालवायचे नवनवीन मार्ग उदयास आले. पब्ज, जाईनट्स, नाईट आउट्स … आणि आणखी किती. हे शहर दिवसा जितक जाग असत, त्याहून कितीतरी अधिक जाग असत रात्री. फक्त पैसा पाहिजे. पण रात्री हे शहर केवळ मौजमजा करण्यासाठी जाग नसत. रात्रीच्या उजेडात इथे होतात वेगवेगळे डील्स. महत्वाच्या कागद पत्रांवर सह्या, कांट्रक्ट मिळविण्यासाठी दिला जातो मोबदला, कमिशन. कधी पैशाच्या स्वरूपात तर कधी ‘ आल एक्सपेन्सेस पेड ‘ च आमिष दाखवून. इथे दिवसा फक्त प्लनिंग होत. खरा सौदा होतो रात्री. डान्स बार फोफावले ते केवळ आंबट शौकिनांमुळे नव्हे. तिथे होत असत मोठ मोठया सरकारी कंत्राटांचे सौदे. डान्स बार बंद होते काही दिवस. नंतर पुन्हा चालू झाले. तो पर्यंत असे सौदे करायला नव्या जागा शोधल्या गेल्या इतकच. सौदा करायचाच म्हटल की कुठे ही करता येतो. पैसे कमविणे, त्यासाठी पैसे देणे आणि आणखी पैसे कमविणे, हे इथल्या लोकांच ध्येय. जमिनीखाली उंदरानी आणि जमिनीवर भ्रष्टाचाराने पोखरल आहे ह्या शहराला. आणि आता तर पैसे दिल्याशिवाय कोणतच काम होणार नाही अशी धारणा झाल्ये सगळ्यांची. ते खोट नाही म्हणा. विशेषत: सरकारी काम असेल तर.
————————————————————————————————
वरळी पोलीस स्टेशनची इमारत तशी अलीकडची. ग्ल्क्सोला राईट टर्न घेतला की उजव्या बाजूस असलेली ती इमारत प्रशस्त प्रांगणामुळे कितीही वर्दळ असली तरी मोकळीच दिसे. पण आज दसरा असल्यामुळे इमारतीत बरीच लगबग दिसून येत होती. पोलिसांच्या वाहनाना हार घालण्यात येत होते, तर मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभन सुरु होते. आय टीव्हीचा वार्ताहर, कमेरामन सहित हजर झाला होता. आजच्या बातम्यांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्स मध्ये दसरा कसा साजरा झाला त्याच कव्हरेज होणार होत. सगळीकडे अगदी उत्साहाच वातावरण होत. तितक्यात झोन तीनच्या कमिशनर साळून्खेंची गाडी आत शिरली. बंदुकधारी हवालदाराने त्यांना कडक सल्युट ठोकला, त्यांनी किंचित मान झुकवली. लगबगीने पायरया उतरत काही पोलिसांनी त्यांच स्वागत केलं. ते रुबाबात चालत आपल्या केबिन मध्ये शिरले. मुख्य कक्षामध्ये पूजा मांडण्यात आली होती आणि बन्दूकाना हार – फूल वाहण्यात येत होती. थोड्याच वेळात कमिशनर साळून्खे आणि इतर अधिकारी असे सर्व जण जमा झाले. हा प्रसंग कव्हर करण्यासाठी आय टीव्हीचा कमेरामन सज्ज झाला. पुढे होत साळून्खेंनी गणेशाच्या मूर्तीला नमस्कार केला. सिनिअर इन्स्पेक्टर जोंधळेनी त्यांच्या हातात नारळ दिला आणि अदबीने मागे सरले. साळून्खेंनी एकाच फटक्यात नारळ फोडला, सर्वानी टाळ्या वाजवल्या. तितक्यात पांढरा सदरा आणि लेंगा घातलेला एक माणूस आत आला. त्याच्या हातात मिठाईचा बाक्स होता.

” शुभ दसरा ” सगळ्यांकडे बघत त्याने अभिवादन केले. सार्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

” घ्या, तोंड गोड करा … ” मिठाईचा बॉक्स पुढे करत तो म्हणाला.

” अरे व्वा ! तुम्हालाही दस    च्या शुभेच्छा ! ”  सब – इन्स्पेक्टर चव्हाण मिठाई घेत म्हणाले.

” घ्या ना साळुंखे साहेब…” त्यांच्या बज कडे बघत तो माणूस म्हणाला. त्यांनी ही एक तुकडा तोंडात टाकला. एकेक करत सगळ्यानी मिठाई खाल्ली.

” अहो पण तुमच काम काय आहे, ते नाही तुम्ही सांगितलं … ” सिनिअर इन्स्पेक्टर जोंधळेनी विचारल.

” कारण इथे जे येतात ते कामासाठीच येतात… ” इन्स्पेक्टर गावडेनी कॉमेंट केली.

” सांगतो सांगतो, आधी तोंड तर गोड करा… ”

” बसा थोड, मग सांगा… ” साळुंखे साहेबानी आग्रह केला.

” बर ते आपले गायतोंडे साहेब कुठे बसतात ? ” काहीतरी आठवल्या सारख करत तो माणूस म्हणाला.

” गायतोंडे साहेब ? पहिल्या मजल्यावर… ” . हवालदार मानेनी माहिती पुरवली.

” थंक यू साहेब, आलोच… ” इतक बोलत, बाक्स बंद करत तो माणूस तिथून बाहेर येऊन पहिल्या मजल्यावर न जाता थेट इमारतीच्या बाहेर आला आणि रस्ता क्रोस करून गर्दीत मिसळून गेला.

अचानक साळुंखे साहेबाना उलटी आली. इन्स्पेक्टर जोंधळेच्या पोटात प्रचंड कळा येऊ लागल्या आणि ते ओरडू लागले. बाकीच्यांची स्थिती काहीशी अशीच झाली. आनंदाच वातावरण एका क्षणात बिघडल. ज्यांनी – ज्यांनी मिठाई खाल्ली, ते ओरडू – विव्हळू लागले. एक दोघाना चक्कर देखील आली.

” च्यायला तो XXXXX आपल्याला विष घालून गेला… पकडा त्याला… ” त्याही स्थितीत सिनिअर इन्स्पेक्टर जोंधळेनी हुकुम सोडला. पण जाणार कोण ? कारण कुणीच हालचाल करण्याच्या स्थितीत नव्हत. ती गडबड ऐकून गेटवरून काही जण धावले. सगळीकडे हलकल्लोळ माजला, शोधाशोध झाली पण व्यर्थ. वरळी पोलीस स्टेशनची इमारत त्या घटनेने हादरली. सर्वाना तातडीने के ई एम मध्ये हलवण्यात आल. वायरलेस वरून सर्व पोलीस स्टेशन्सना अनोळखी व्यक्ती कडून खाद्य पदार्थ घेण्यास मनाई करण्याबद्दल कळविण्याचा प्रयत्न झाला पण मेसेज पोहचे पर्यंत कित्येक तास उलटून गेले होते. कारण बर्याचशा जीपीआरेस सिस्टीम्स दुर्लक्षित मेंटेनन्स मुळे खराब स्थितीत होत्या. वस्तूस्थिती त्याहून अधिक बिकट होती. मुंबई पोलिसांनी दोन हजार सहा मध्ये सगळ्या कंट्रोल रूम्सच जे पर्फोरमन्स आडिट केलं होत आणि आयएसओ सर्टिफिकेशन ही मिळवल होत, त्याच गेल्या चार वर्षात नूतनीकरण देखील केलं गेलेलं नव्हत. अशी संपर्क यंत्रणा असेल, तर आणखी होणार ? काही पोलीस स्टेशन्सना रात्री उशीरा त्या घटनेबद्दल कळलं. के ई एम मध्ये उलट्यांची सम्पलस घेण्यात आली आणि ती फारेन्सिक लब मध्ये विश्लेषणा करीता पाठविण्यात आली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s